Plant Protection
मँगो हॉपर (तुडतुडे)
सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार | निफ्प आणि प्रौढ पानांतील रस शोषुन घेतात. |
अंडी देण्याचा काळ | लहान आकाराची अंडी पानांच्या गाभ्यात, फुलो-याच्या देठात, तसेच कळ्यांत दिली जातात. अंडी अवस्था 4 ते 7 दिवसांची असते. |
सुप्तावस्था | प्रौढ हॉपर्स उन्हाळ्यात क्रियाशिल राहतात. |
नियंत्रणाचे उपाय | डामेथोएट, फॉस्फोमिडॉन, सल्फर, कार्बारिल, इमिडाक्लोप्रिड, असिटामॅप्रिड ची फवारणी करावी |
स्टेम बोरर
सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार | ग्रब खोड, फांद्या, मुळे पोखरतो. छिद्रातुन घाण पदार्थ स्रवलेला दिसुन येतो. अळी पिवळसर रंगाची असते. अळी अवस्था 170 ते 190 दिवसांची असते. |
अंडी देण्याचा काळ | पांढ-या रंगाची चमकदार अंडी खोडाच्या सालीच्या खाली दीली जातात. |
सुप्तावस्था | सुप्तावस्था खोडांत किंवा फांदीत पुर्ण करते. सुप्तावस्था 1 महिना ते 6 महिन्यांची असते. |
नियंत्रणाचे उपाय | क्विनालफॉस व डायक्लोरव्हॉस चे द्रावण इन्जेश्कन द्वारे टनेल मध्ये सोडावे. किंवा अल्युमिनियम फॉस्फाईड च्या गोळीचे तुकडे करुन छिद्रात टाकावे. |
फळ माशी
सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार | लहान अळ्या (मॅगोट) फळातील गर खातो. ज्या ठिकाणातुन फळांत अंडी दिलेली असतात तो भाग तपकिरी होतो. प्रादुर्भाव ग्रस्त फळ कुजते व लवकर खाली पडते. |
अंडी देण्याचा काळ | फळांवर (देठ जुळतो त्या भागाजवळ) अंडी दिली जातात. काहीशी पारर्दशक रंगाची 2 ते 15 अंडी दीली जातात. अंडी अवस्था 2 ते 3 दिवसांची असते. |
सुप्तावस्था | कोष हा तपकिरी रंगाचा असतो. सुप्तावस्था जमिनीवर पुर्ण केली जाते. |
नियंत्रणाचे उपाय | केमिकल ट्रॅप तसेच कामगंध सापळ्यांचा वापर करावा. |
स्टोन व्हीविल
सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार | ग्रब फळाच्या गरतुन आतील बी (कोय) च्या सालीला पाखरुन बी (कोय) च्या आतील गर खातो. |
अंडी देण्याचा काळ | लहान, पांढरी अंडी परिपक्व होत जाणा-या फळांवर (देठ जेथे फळांस जोडला जातो तेथे) दिली जातात. |
सुप्तावस्था | सुप्तावस्था बी (कोय) च्या आत पुर्ण केली जाते. एक पिढी 40 ते 50 दिवसांत पुर्ण केली जाते. प्रौढ जुलै- ऑगस्ट पासुन पुढील हंगामापर्यंत सुप्तावस्थेत राहतात. एका वर्षात एकच पिढी असते. |
नियंत्रणाचे उपाय | केरोसिन ऑईल इमल्शन ची खोडावर फवारणी घ्यावी. दर 15 दिवसांनी फळांवर मॅलेथिऑन ची फवारणी घ्यावी. |
गॉल मिज (मिज माशी)
सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार | अळी पानांवर फोड आल्यासारखे ठिपके तयार करते. किड पानांवर, फुलोरा, तसेच लहान फळांवर देखिल उपजीविका करते. |
अंडी देण्याचा काळ | कोवळ्या पानांवर तसेच डोळ्यांवर (बड) दिली जातात. अंडी एकट्याने (एका ठिकाणी एक) दिली जातात. |
सुप्तावस्था | सुप्तावस्था कोषात पुर्ण केली जाते. कोष तपकिरी पिवळसर असतो. प्रौढ नारंगी रंगांची सुक्ष्म माशी असते. |
नियंत्रणाचे उपाय | नविन फुट येत असतांनाच कार्बारील, फॉस्फोमिडॉन, डायझिनॉन ची फवारणी करावी. |
Install methyl ugenol “Rakshak” tarp @ 4 nos. per ha in cucurbitaceous vegetable crops, for effective
control of fruit fly.